Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पीएम केअर फंडाची माहिती विचारली, सोनिया गांधी यांच्या विरोधात वकिलाकडून एफआयआर

Spread the love

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरूद्ध कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात पंतप्रधान केअर फंडाशी माहिती विचारल्याबद्दल आणि  इतर आरोपांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

या फिर्यादीत ११ मे रोजी काँग्रेस पक्षाने खोटे दावे करत केंद्र सरकारवर खोटे आरोप केले गेले, असा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित काही आरोप केले होते. हे आरोप चुकीचे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे . काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३, ५०५ अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे.

काँग्रेस पक्षाकडून  सतत मोदी सरकारवर आरोपांचा भडिमार केला जात आहे. मोदी सरकार राज्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही काँग्रेस करत आला आहे. पंतप्रधान केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणीही सतत काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्द्यावर सतत टीका केली जात आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेसच्या वतीने पत्रही लिहिले गेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!