Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrime : औरंगाबाद अवैध गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : कारमधून गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून एमआयडीसी वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे मंगळवारी (दि.१२) पकडले. पोलिसांनी ८५ हजार ५०३ रूपये किमतीचा  गुटख्याचा साठा व २ लाखरूपये किमतीची  कार असा एकूण  २ लाख ८५ हजार ५०३ रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे. गोलू सदाशिव खूपसे (वय 24) , वासिस्ट रामकीसन पवार (वय ४०) दोघे राहणार वडगाव कोल्हाटी, एमआयडीसी वाळूज असे गुटख्याची वाहतूक करणा-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडगाव कोल्हाटी येथे कार मधून दोघे जण गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार तुकाराम राठोड, गजानन मांते, ओमप्रकाश बनकर, राहुल खरात, भावसिंग चव्हाण, धर्मराज गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी आदींनी वडगाव कोल्हाटी येथे सापळा रचून कार क्रमांक (एमएच-१५-सी एम-५३७६) पकडली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये 85 हजार ५०३ रूपये किमतीचा  राजनिवास गुटखा, जाफराणी जर्दा आदीचा साठा मिळून आला. याप्रकरणी गोलू खूपसे, वशिष्ठ पवार यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारावाई गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने केली.

अंबिकानगरात पाच जुगारी ताब्यात

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकत्र जमून जुगार खेळणा-या पाच जणांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी सहाच्या सुमारास मुकुंदवाडीतील अंबिकानगरात करण्यात आली. अंबिकानगरातील बाबासाहेब शामराव कुबेर यांच्या घरासमोरील ओट्यावर शिवाजी तुकाराम शेलार (३८, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी), प्रकाश गंगाराम कुबेर (३४), गणेश रामू हरणे (३१), भारत नारायण बचाटे (३२) आणि राहुल गौतम खरात (३१, सर्व रा. अंबिकानगर) यांना जुगार खेळताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख असा १८ हजार ८६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार कौतिक गोरे करत आहेत.

सरपनाची लाकडे नेल्यावरुन मारहाण

औरंगाबाद : पत्र्यावरील सरपनाची लाकडे का नेली या कारणावरुन दोघांनी महिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारस सिंधीसिरजगाव गायरान येथे घडली. अजय चेलअप्पा काळे (२७), खंड्या उर्फ अर्जुन चंद्रकांत काळे, गौरी अर्जुन काळे हे सख्खे चुलते पुतणे आहेत. सोमवारी सकाळी खंड्या व त्याची पत्नी गौरी हे अजयच्या घरासमोर आले. त्यावेळी त्यांनी घराच्या पत्र्यावरील सरपनाची लाकडे का नेली असे म्हणत अजयची आई शवराबाई हिला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच त्याची भावजयी कोमल हिला मारहाण व शिवीगाळ केली. त्यावरुन दौलताबाद पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार पचलोरे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!