Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : लग्नाचा वाढदिवस केला साजरा चौदा जणांविरुध्द पोलिसात गुन्हा, अन्य एका कारवाईत उत्पादन शुल्ककडून देशी दारूचे बॉक्स जप्त

Spread the love

कोरोनाचे सावट असताना सिडको, एन-३ भागात परिसरातील नागरिकांना जमवून लग्नाचा वाढदिवस साजरा करणा-या चौदा जणांविरुध्द पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुप विजयप्रकाश आसोफा व दत्तात्रय विश्वनाथ जाधव यांच्यासह चौदा जणांचा यामध्ये समावेश आहे.
सिडको, एन-३ भागात नागरिक एकत्र येऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सोमवारी रात्री पोलिसांनी एन-३ भागात धाव घेतली. त्यावेळी कैलास हाऊसिंग सोसायटीतील नागरिक सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता आसोफा व जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावरुन दोघांसह चौदा नागरिकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उत्पादन शुल्क विभागाकडून दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटे कन्नड तालुक्यातील अंबा शिवारात छापा मारुन देशी दारुचे १३ बॉक्स जप्त केले. कन्नड तालुक्यातील कालीमठ ते अंबा शिवार येथून कारने देशी दारुचे बॉक्स नेले जाणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने पाठलाग करुन धर्मराज अनिल बच्छे व राजेंद्र गोकुळ वाघ (दोघेही रा. पाटणादेवी रोड, चाळीसगाव) यांना पकडले. त्यांच्याकडून कार व देशी दारुचे बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकुर, बी. के. चाळणेवाड, जवान डी. एस. साळुंके, बी. बी. चाळणेवाड, डी. पी. लघाने, अश्फाक शेख यांनी केली.
……
हातभट्टीचे रसायन नष्ट
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कन्नड तालुक्यातील वडाळी येथील वाघदरा धरण परिसरात मंगळवारी छापा मारला. या छाप्यात पथकाने हातभट्टीची दारु बनविण्यासाठी वापरणारे एक हजार लिटर रसायन जागीच नष्ट केले. याप्रकरणी तीन अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!