Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रात १६ हजाराहून अधिक रुग्णसंख्या , जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील ताजी स्थिती…

Spread the love

राज्यात आज कोरोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ६५१ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १६ हजार ७५८ इतका झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान करोना साथीने मुंबई, पुणे या महानगरांत  रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील करोना साथीचा आजचा तपशील धोक्याची घंटा वाजवणारा आहे. आज राज्यात एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात एका रुग्णांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

सध्या राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १०,७१४ (४१२) , ठाणे: ८६ (२), ठाणे मनपा: ५४३ (८),  नवी मुंबई मनपा: ५१९ (४), कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३), उल्हासनगर मनपा: १३, भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२), मीरा भाईंदर मनपा: १८७ (२), पालघर: ३६ (१), वसई विरार मनपा: १७५ (४), रायगड: ६० (१),  पनवेल मनपा: ११५ (२), ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१),  नाशिक: २४, नाशिक मनपा: ४८, मालेगाव मनपा: ३९१ (१२), अहमदनगर: ४४ (२), अहमदनगर मनपा: ०९, धुळे: ८ (२), धुळे मनपा: २४ (१), जळगाव: ५१ (११), जळगाव मनपा: १४ (२), नंदूरबार: १९ (१), नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१), पुणे: १०३ (४), पुणे मनपा: १८६१ (११५), पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३), सोलापूर: ६, सोलापूर मनपा: १६९ (८), सातारा: ८९ (२), पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२), कोल्हापूर: १० (१), कोल्हापूर मनपा: ६, सांगली: ३२, सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१),  सिंधुदुर्ग: ४ (१), रत्नागिरी: १६ (१), कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४), औरंगाबाद: ३, औरंगाबाद मनपा: ३७० (११), जालना: ८, हिंगोली: ५८, परभणी: १ (१), परभणी मनपा: १ , औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२) ,  लातूर: १९ (१), लातूर मनपा: ०, उस्मानाबाद: ३, बीड: १, नांदेड: ३, नांदेड मनपा: २८ (२), लातूर मंडळ एकूण: ५४ (३), अकोला: ८ (१), अकोला मनपा: ७५ (८), अमरावती: ४ (१),  अमरावती मनपा: ६९ (९) , यवतमाळ: ९२, बुलढाणा: २४ (१), वाशिम: १, अकोला मंडळ एकूण: २७६ (२०), नागपूर: २, नागपूर मनपा: १८० (२), वर्धा: ०, भंडारा: १, गोंदिया: १, चंद्रपूर: १, चंद्रपूर मनपा: ३, गडचिरोली: ०, नागपूर मंडळ एकूण: १८८ (२), इतर राज्ये: ३२ (६), एकूण: १६ हजार ७८५ (६५१)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!