Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate: गल्लेबोरगाव येथे बनावट दारूचा कारखाना उध्वस्त, ६३ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : गल्लेबोरगाव हायवेवर असलेल्या इसार पेट्रोल पंपासमोरील बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री उदध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी ६३ लाख ८३ हजार ८१३ रूपये किमतीची  बनावट देशी-विदेशी दारू, दोन पॅकींग मशिन, विविध कंपन्यांच्या  नावाचे देशी दारूचे स्टीकर, एक आयशर ट्रक, पिकअप व्हॅन, एक तवेरा कार, दोन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक भागवत फुंदे , सीताराम मेहेत्रे, भगतसिंग दुलत, संदीप सांळुके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी बनावट कारखान्याचे मालक संजय भागवत याला पोलिसांनी अटक केली आहे.

गल्लेबोरगाव शिवारातील संजय भागवत यांच्या शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदिप सोळंखे, सहाय्यक फौजदार सुधार दौड, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, विठ्ठल राख, रतन वारे, गणेश मुळे, शेख नदीम, किरण गोरे, दिपेश नागझरे, रामेश्वर धापसे, गणेश गांगवे, योगेश तरमळे, वसंत लटपटे, संजय तांदळे, उमेश बकले आदींच्या पथकाने छापा मारला. त्यावेळी संजय कचरु भागवत (वय ४८), महेश संजय भागवत (वय २४), योगेश वसंतराव डोंगरे (वय २६) सर्व राहणार गल्लेबोरगांव हे पोलिसांना पाहुन पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले.
पोलिसांनी कारखान्याची झडती घेतली असता, त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारूचे ७९ बॉक्स, प्लास्टीकच्या दोन टाक्यांमध्ये तयार असलेली एक हजार लिटर बनावट दारू, दोन पॅकींग मशीन, दोन मिक्सर मशिन, एक फिलींग मशिन, विविध कंपन्यांचे  नावाचे बनावट स्टिकर, बनावट झाकणे, पॅकेजींग कॅप, बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे विविध फ्लेवर्स, एक आयशर ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक तवेरा कार, दोन दुचाकी असा एकूण  ६३ लाख ८३ हजार ८१३ रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!