Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Aurangabad Crime : रिलायन्स मॉल फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबवला, दुसऱ्या दोन घटनांमध्ये ५ लाखांना गंडविले…

Spread the love

औरंंंगाबाद : गजानन महाराज मंदीर परिसरातील रिलयान्स मॉलच्या स्टाफ इंन्ट्री गेटचे कुलूप तोडुन चोरट्यानी मॉलमधील २ लाख २२ हजार १९८ रूपये किंमतीचे मोबाइल व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना ३० मार्च ते १२ एप्रिलच्या दरम्यान घडली.
चोरट्यांनी गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल स्टोअरचे स्टाफ इंन्ट्री गेटचे कुलूप तोडून मॉलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी मोबाइल सेक्शनमधील तीन महागडे मोबाईल, विविध कंपनीचे हेडफोन, ब्ल्युटुथ स्पीकर व इतर साहित्य असा जवळपास २ लाख २२ हजार १९८ रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी रिलायन्स मॉल स्टोअरचे मॅनेजर अझरूद्दीन बदु्रद्दीन काझी (वय ३४, रा. पटेल लॉन्स मागे, शहा कॉलनी, बीड बायपास) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चोरट्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक खटके करित आहेत.

चोरटे सीसीटिव्हीत कैद
मोबाइल सेक्शनमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. चोरटे हे स्टाफ गेटने आल्याने यात कोणत्या कर्मचाNयाचा सहभाग आहे का हे देखील तपासले जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
——————————————————-
भामट्याने महिला डॉक्टरला ४ लाख २१ रूपयांना गंडविले

औरंंंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या बँक खात्यातून भामट्याने ऑनलाईनरित्या ४ लाख २१ हजार रूपये लंपास केले. भामट्याने महिला डॉक्टरच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केल्याचा प्रकार ७ ते ८ एप्रिलच्या दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
निधी फुलचंद  चित्रवंशी (वय २८, रा. म्हाडा गोलाई, बोरीवली पश्चिम,मुंबई,ह.मु. मार्ड वसतिगृह, घाटी परिसर) या घाटी रूग्णालयात कार्यरत आहेत. भामट्याने निधी चित्रवंशी यांच्या बॅक खात्यातून ऑनलाईनरित्या ४ लाख २१ हजार रूपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यावर निधी चित्रवंशी यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप करीत आहेत.

दामदुपटीचे आमिष दाखवून पोलिसालाच गंडविले

दामदुपटीचे आमिष दाखवून चौघांनी उपेंद्रसिंग केशरसिंग सूर्यवंशी  (वय ४७, रा.गवळीपुरा, छावणी) यांना १ लाख ५ हजार रूपयांचा गंडा घातला. मनोज पाटील, सचिन पाटील, प्रिती दुबे, शेख यांनी रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल धनश्री येथे रूम नंबर १०१ मध्ये कार्यालय थाटले होते. उपेंद्रसिंग सुर्यंवशी यांना तुम्ही गुंतविलेले पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून चौघांनी २८ ऑगस्ट २०१९ ते १३ एप्रिल २०२० या काळात १ लाख ५ हजार रूपये घेवून फसवणूक केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक डुकरे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!