Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे निमंत्रण नसल्याने खा . ओवैसी यांनी अशी डागली तोफ !!

Spread the love

येत्या ८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पण या बैठकीसाठी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना बोलावण्यात आलेले नाही. यावरून ओवेसी यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे कि , हैदराबादमधून ओवेसी ते  स्वतः खासदार असून  महाराष्ट्रातील औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे एमआयएमचे दुसरे खासदार आहेत. यामुळे बैठकीला न बोलावून पंतप्रधान मोदींनी हैदराबाद आणि औरंगाबादच्या नागरिकांचा अपमान केला आहे, असं ओवेसी म्हणाले.

ओवेसी यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला लोकसभा आणि राज्यसभेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ज्या पक्षांचे किमान पाच खासदार आहेत अशाच नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर एमआयएमचे फक्त दोन खासदार आहे.

ओवेसी यांनी पंतप्रधान कार्यलयाला टॅग करत ट्विट केले आहे. हैदराबाद आणि औरंगाबादच्या नागरिकांचा हा मोठा अपमान आहे. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराला निवडून दिलंय म्हणून ते नगण्य आहेत का? हे नागरिक पंतप्रधानांच्या संदेशासाठी पात्र नाहीत का? हे स्पष्ट करावं. खासदार म्हणून आमच्या मतदारसंघातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्या मांडण्याचं आमचं काम आहे, असं ओवेसी म्हणाले. हैदराबादमध्ये करोनाचे ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला आमचे विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे. कुठ आपण कमी पडतोय, हे समोर मांडणं गरजेचं आहे, असं ओवेसी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!