Aurangabad Crime : कोरोना रुग्णाबाबत व्हाॅट्सअॅपवर अफवा , डाॅक्टरासहित एकावर कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

ओरंगाबाद – चिकलठाणा परिसरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल करणार्‍या डाॅक्टरासहित अन्य एका इसमावर सिडको औद्योगिक पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केले.
डाॅ.व्यंकटेश उबाळेरा.खोकडपुरा आणि महेश देशपांडे असे आरोपींचे नाव आहेत. वरील दोघांनी व्हाॅट्सअॅपवर मंगळवारी धूत रुग्णालयात कोरोना व्हायरस मुळे एकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली.धूत रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेत सिडको औद्योगिक पोलिसांकडे तक्रार दिली.पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तक्रारीची शहानिशा करुन आरोपी डाॅ.उबाळे आणि देशपांडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करुन रितसर समज देऊन सोडून दिले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय इंगळे करंत आहेत.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार