Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : सावधान !! व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला “तो ” मॅसेज निव्वळ अफवा, कोरोनासाठी रक्ताची कुठलीही टेस्ट होत नाही

Spread the love

‘करोना’ संशयितांची रक्त तपासणी करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील काही रुग्णालयांच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियात विशेषत: व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असून  ‘करोना’च्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. संशयित व्यक्तीच्या घशातील थुंकीचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यामुळं नागरिकांनी रक्त तपासणीबाबतच्या कुठल्याही चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे. सध्या कोरोना टेस्ट पुणे , नागपूर येथेच उपलब्ध आहे आणखी पाच ठिकाणी हि सुविधा वाढविण्यात येणार त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या रक्त तपासणी संबंधी रुग्णालयांच्या यादीवर विश्वास ठेवू नये आणि असे मॅसेज फॉरवर्ड करू नये असे कळविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपवर पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने  महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. ‘राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशातील थुंकीचा द्राव (‘नसो फॅरिंजीयल स्वॅब’) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा मुंबईतील केईएम रुग्णालय व हाफकीन इन्स्टिट्यूटसह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने  दिली आहे. त्यामुळं रक्त तपासणीसारख्या मॅसेजवर कोणीही विश्वस ठेवू नये, असे  आवाहन करण्यात आले  आहे.

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग  वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. गर्दी टाळणे  हा कोरोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे  समोर आले  आहे. त्यामुळे  राज्यभरात त्या दृष्टीने  उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. पुणे, नागूपरसारख्या महानगरांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!