Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वाहनचोरांची आंतरराज्यीय टोळी अटक, ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – शहर आणि जिल्ह्यात हायवाट्रक चोरी करणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केली.या प्रकरणात चार रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून ३५लाख ४९हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिवाजी अशोक लहिरै रा.वांजरगाव वैजापूर,महैश बिरुडे,रा.नाशिक, अब्दुल कलाम मोहम्मद इस्लाम चौधरी रा.जिल्हा संतकबीर उत्तरप्रदेश, दिवाकर एकनाथ चव्हाण रा.दिल्ली, शुबनेसकुमार भाटीया रा.इलाहाबाद, उत्तरप्रदेश, मो.इस्तीखान मो. सफारखान रा.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.उत्तरप्रदेश आणि गुजराथ मधील रेकाॅर्डवरच्या आरोपींनी वरील गुन्हा केला असून या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणाल्या.वरील टोळके धुळे शहरातून सक्रिय असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. हायवा आणि इतर चारचाकी वाहने तोडून त्यांचे चेसीस नंबर बदलण्याचे मोठे गुन्हे सतत घडत असल्याचे पोलिसांच्या या तपासा दरम्यान निदर्शनास आले
वैजापूर परिसरातील डव्हाळा शिवारातून ८ जानेवारी रोजी हायवा चोरीस गेल्याचा गुन्हा वैजापूर पोलिसांकडे दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक पाटील यांनी गुन्हेशाखेला करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांच्या सहकार्याने वरील कारवाई पार पाडली. या कारवाईत पीएसआय संदीप शेळके, भगतसिंग दुलंत, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे श्रीमंत भालेराव, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!