Hingoli Crime : बलात्कारामुळे गर्भवती महिलेची आत्महत्या , तिघांविरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी पसार

Advertisements
Advertisements
Spread the love

हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखर गावात दोन महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर या सगळ्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिला अत्याचाराच्या याबाबतीत सर्वत्र चर्चा होत असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश निर्माण झाला आहे. दरम्यान गर्भवती महिलेवर अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Advertisements
Advertisements

पीडित  महिला दोन  महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे यात एका बाळाचाही मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घरातून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

आपलं सरकार