Aurangabad Crime : कुरिअर मॅनेजरचा दिवसा भोसकून खून, आरोपी पसार

औरंगाबाद – सुपारी हनुमान परिसरातील नगारखाना या गजबजलेल्या वस्तीत आज (३१/१) दुपारी १२.३० वा. चार जणांनी तोंडाला मास्क लावंत कुरिअर मॅनेजरचा चाकुने वार करंत खुन केला.व पसार झाले.या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.अशी माहिती पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली. प्रकाश जसवंतभाई पटेल उर्फ कमलेशभाई, वय ३४, रा.गुजरात, सध्याचे मुक्काम नगारखाना गल्ली, गुलमंडी परिसर असे मयत कोरीयर कंपनीच्या मँनेजरचे नाव आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , नगारखाना गल्लीत सत्यानंद बन्सीलाल पटेल यांच्या घरामधे मयत प्रकाश पटेल यांचे रामुभाई मोहनलाल कुरिअर सर्व्हीस या नावाने कार्यालय होते. त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी संजय गोस्वामी काम करंत होते. आज दुपारी साडेबारा वा. चौघे जण तोंडाला मास्क लावून प्रकाश पटेल यांच्या कार्यालयात घुसले व एकाने कार्यालयातील संजय गोस्वामी यांच्याकडे मोर्चा वळवला तर बाकी तिघे प्रकाश पटेल यांच्या अंगावर धावले.पण गोस्वामी हा बाथरुम मधे लपून बसला होता. मात्र त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाणाऱ्या पटेल यांच्या छातीवर त्यांनी चाकूने वार केला व पायी निघून गेले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या प्रकाश पटेल यांनी ऑफीस जवळच राहत असलेल्या नातेवाईकाच्या घराकडे धाव घेत असताना ते खाली कोसळले. त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
विशेष म्हणजे आरोपी पटेल यांच्या कार्यालयात येतांना व जातांना पायीच गेल्याचे सी.सी. टि.व्ही. फुटेज सिटी चौक पोलिसांना मिळाले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सय्यद करंत आहेत. दरम्यान प्रकाश पटेल हे हवाला चा व्यवहार करंत होते का ? यावर पोलिसांनी भाष्य करणे टाळले. मयत प्रकाश पटेल हे दिवाण देवडीच्या बाजुला असलेल्या नगारखाना गल्लीत असलेल्या मोहन कुरिअर कंपनीत मँनेजर म्हणून काम करत होते. नगारखाना गल्लीतील ऑफिसवर ते नेहमी बसत होते. कामानिमित्ताने हे नेहमी गुजरात यथे जात असत. शुक्रवारी सकाळीच प्रकाश पटेल हे गुजरातहून शहरात आले होते. सकाळी ऑफीस उघडल्यावर काही वेळ ते ऑफिसचे काम करत बसले होते.