Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Update : जालना महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला क्रुजर जीप धडकून चार जण ठार..

Spread the love

औरंगाबाद जालना रोडवर सटाणा ते गाढेजळगाव फाट्या दरम्यान शुक्रवारी (ता. ३१) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास औरंगाबादहुन जालण्याकडे जाणाऱ्या  क्रुजरने (MH28 AN 3620) रोडच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या टेलर (MH40BJ8111) मागच्या बाजूने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात पत्रकारासह तीन जण जागीच ठार झाले आहेत.  अपघातातील ९ जखमींना उपचारार्थ औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आहे. अपघातातील सर्व बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेदराजा तालुक्यातील असून इगतपुरी येथून देवदर्शनाहुन गावी परततअसताना हा भीषण अपघात झाला.

कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप कारण समोर येऊ शकलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक चांदुरकर , पोलीस उपनिरीक्षक आलमगीर शेख , पोहेकॉ. जे. बी. मुरमे , बी.एल. चव्हाण , राज्य रस्ता वाहतूक पोलीस आदींनी घटना स्थळ भेट दिली.

अपघातात ४ मृतांमध्ये १) काशिनाथ देवराव मेहत्रे (६२)
२) रवी बबन जाधव (३२) दोघेही रा. नशिराबाद ता.शिंदखेडराजा
३) संगीता  गणेश बुंदे (४५) रा.तांदूळवाडी ता.शिंदखेडराजा
४) ऋषीधर देवराव तिडके (५५) रा.गोंदेगाव ता.जी.जालना. यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!