Aurangabad Crime : संगणक-प्रिंटरच्या सहाय्याने त्याने बनवले नासा चे बनावट ओळखपत्र, संगणक-प्रिंटर, बनावट ओळखपत्र जप्त

Spread the love

औरंंंगाबाद : अमेरिकेच्या नासा या संस्थेकडून आरआरसी रिअ‍ॅक्टर ऑफ ५ मेगावॅट हा प्रकल्प तयार करण्याचे वंâत्राट मिळाले असल्याची थाप मारून २८ गुंतवणूकदारांना २ कोटी ५० लाख रूपयांचा गंडा घालणा-या नाशिकच्या अभिजीत विजय पानसरे (वय ३५) या भामट्याला गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असलेल्या अभिजीत पानसरे याच्याकडून नासाचे बनावट ओळखपत्र, संगणक प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरूवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली.
गारखेडा परिसरातील विशालनगर येथे राहणा-या शरद किसनराव गवळी यांच्यासोबत अभिजीत पानसरे व अ‍ॅड. नितीन रायभान भवन (रा.सिडको) यांची २०१६ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी पानसरे याने आपली मे. सायन्स कुडोस वंâपनी असून या वंâपनीला अमेरीकेची संशोधन संस्था असलेल्या नासाकडून आरआरसी रिअ‍ॅक्टर ऑफ ५ मेगा वॅट पावर हा प्रकल्प तयार करण्यासाठी पर्चेस ऑर्डर मिळाली असल्याचे सांगितले होते. तसेच आपल्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देतो असे आमिष पानसरे याने गवळी यांना दाखविले होते. पानसरे याच्यावर विश्वास ठेवून गवळी यांच्यासह २८ जणांनी २० ऑक्टोबर २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ या काळात २ कोटी ५० लाख रूपयांची गुंतवणूक पानसरे याच्या प्रकल्पात केली होती. परंतु पानसरे याने कोणताही परतावा न देता फसवणूक केल्यानंतर या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अभिजीत पानसरे याला अटक केली होती. तपासादरम्यान त्याच्याकडून रॉ चा अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले होते. पानसरे याने गुंतवणूकदारांना विश्वास बसावा म्हणून नासाचे बनावट ओळखपत्र संगणक-प्रिंटरच्या सहाय्याने तयार केले होते. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, सहाय्यक फौजदार सुभाष खंडागळे, जमादार गोकुळ वाघ, सुनील पेâफाळे, मनोज उईके, बाळासाहेब आंधळे, नितीन घोडके, जयश्री पुâके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार