Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : नाशिकचा तोतया रॉ चा अधिकारी गजाआड, ‘नासा’मध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून चोवीस जणांना घातला कोट्यावधीचा गंडा

Spread the love

औरंंंगाबाद : देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याची थाप मारून अनेकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणा-या भामट्याच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला कोर्टाकडून ९ दिवसांची (१८जाने) पोलिस कोठडी मिळाली आहे. अभिजीत पानसरे (रा.नाशिक) असे तोतया रॉ च्या अधिका-याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी शुक्रवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षीत असलेला पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता. नाशिकपोलिसांनी तीनवर्षांपूर्वी तोतया आयपीएस अधिकारी म्हणून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांच्यासोबत अभिजीत पानसरे याच्यासोबत २०१६ मध्ये अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती.त्यावेळी पानसरे याने आपण रॉ चे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्याला न्युक्लीयर रियाकटर तयार करण्याचे कंत्राट  मिळाले आहे असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.
दरम्यान, अभिजीत पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी २० ऑक्टोबर २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ या काळात १५ लाख रूपयांची तर त्यांच्या सोबत २३ जणांनी मिळून अडीच कोटी रु.गुंतवणूक पानसरे याच्या प्रकल्पात केली होती. त्यानंतर पानसरे हा वेळोवेळी गवळी यांना परतावा देण्यास टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर शरद गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. सुभाष खंडागळे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!