Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपीची हत्या, तीन दिवसापासून होता घरातून बेपत्ता

Spread the love

औरंंंगाबाद : चार वर्षापूर्वी शहरात गाजलेल्या डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपी असलेल्या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सिडकोतील अयोध्यानगर परिसरात एकच खळबळ उडाली. अमोल नारायण घुगे (वय २२, रा.शिवनेरी कॉलनी, सिडको) असे मयत युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल घुगे हा ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून बेपत्ता होता. अमोलच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतल्यावरही तो मिळून न आल्याने सिडको पोलिस ठाण्यात अमोल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी सिडको एन-७ परिसरात असलेल्या अयोध्यानगरीतील नाल्याच्या ढाप्यातून दुर्गंधी येत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर सिडको पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून नाल्याचा ढापा उघडला असता त्यात अमोलचा मृतदेह मिळून आला.
मारेकर्‍याने अमोलची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह नाल्यात टाकून दिला होता. दरम्यान, अमोल घुगे हा २०१५ साली शहरात झालेल्या डॉ. चित्रा डकरे (रा. अमरावती) यांच्या खून प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमोल हा पोलिस कर्मचार्‍याचा मुलगा असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!