Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद : परित्यक्तेचा संशयास्पद मृत्यू, जमावाने केली रुग्णालयातील कर्मचार्‍यांना मारहाण

Spread the love

औरंगाबाद – वर्षाअखेरच्या मध्यरात्री परित्यक्तेला अज्ञात रिक्षाचालकाने धूत रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केले.या मुळे जमलेल्या जमावाने रुग्णालयातील अॅब्यूलस चालक आणि एका अपंग ब्रदरला मारहाण करंत रुग्णालयात तोडफोड केली.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दंगा करण्याचा गुन्हा शेकडो अज्ञात लोकांवर दाखल केला आहे.

बदनापूर जवळील शेलगाव येथील परित्यक्ता वैशाली अरुण सोनवणे(३२) ही भावाला भेटण्यासाठी औरंगाबादेत येत असतांना रात्री १०च्या दरम्यान मधेच मृतावस्थेत  आढळल्याने तिला अज्ञात रिक्षावाल्याने तिला सैठ नंदलाल धूत रुग्णालयात आणून सोडले. व निघून गेला. त्यावेळी रुग्णालयात डाॅ.अमोल कुलनारे यांनी वैशाली सोनवणे यांना तपासून मयत घोषीत केले.तसेच रुग्णालयातील इतर कर्मचार्‍यांनी मयत महिलेची ओळंख पटते का याचा शोध घेण्यासाठी मयत महिले जवंळ असलेल्या पर्स मधून मोबाईल काढून त्यामधे असलेल्या नंबर वर वैशाली सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे कळवले. तेंव्हा थोड्याच वेळात शेकडो लोक  रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान मंगळवारीरुग्णालयातील अॅम्ब्यूलन्स चालक शंकर उचीत(४०) घडलेला प्रकार जमावाच्या कानावर घालंत असतांना संतापलेल्या जमावाने रुग्णालयात तोडफोड करुन शंकर उचित यांना व त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण केली. उचित यांच्या फिर्यादीवरुन एम.सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द दंगा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!