Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सिडकोत डॉक्टरचा बंगला फोडून ७७ तोळे सोने लंपास, सिडको एन ४ परिसरातील घटना

Spread the love

औरंगाबाद : सिडको एन ४ परिसरात राहणा-या सेवानिवृत्त डॉक्टराचा बंगला फोडून चोरट्यांनी ७७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ४ लाख ७५ हजार रूपये असा एकूण  जवळपास २० ते २२ लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नामदेव कलवले (वय ६७) हे सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन असून त्यांचा सिडको एन-४ भागात आलीशान बंगला आहे. कलवले कुटुंबिय काही कामानिमित्ताने दोन दिवसापासून अहमदनगर येथे गेले आहे. कलवले यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधुन चोरट्यांनी घराचा समोरील दरवाजा टिकासच्या सहाय्याने फोडून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील तसेच वरच्या मजल्यावरील बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील जवळपास ७७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ४ लाख ७५ हजार रूपये असा एवूâण २० ते २२ लाख रूपये किमतीचा  ऐवज चोरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच नगरला गेलेले कळवले कुटुंबीय  सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोनवणे, उपनिरीक्षक पुरी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून बंगल्याची पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला व पिंâगरप्रिंट तज्ञांना देखील पाचारण केले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!