Aurangabad Crime : व्यापार्‍यांची ४२ कोटी ११लाखांची फसवणूक, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : एकूण ३४ व्यापार्‍यांकडून खरेदी केलेल्या मक्याचे पैसे न देता व्यापा-यास ४२ कोटी ११ लाख रु.चा गंडा घालणा-या दोन जणांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज धन्नालाल चुडीवाल (वय ४३, रा.मेडॉज अप-टाऊन, शहानुरवाडी) व अन्य ३३ जणांनी गुन्हेशाखेकडे या संदर्भात धाव घेतली होती. पंकज चुडीवाल आणि इतर व्यापारी सहकार्याची जाधववाडी ट्रेडींग नावाची कंपनी  आहे.

Advertisements

यातील पंकज चुडीवाल यांच्याकडून ट्रेडको इंडीयाकंपनी  प्रा.लि.चे मालक राजरतन अग्रवाल यांनी १२ जुन २०१८ रोजी श्री हॉर्नेस्ट डेरीवेटीव माल दाभाडी, जामनेर, व श्री ट्रेडको डिसाल प्रा.लि. देवपुर, रोड धुळे येथे आस्था कार्पाेरेशनच्या मध्यस्थीने पाठविलेले ३५ लाख ६३ हजार ७८० रूपये किमतीचा  मक्का खरेदी केला होता. त्यानंतर राजरतन अग्रवाल यांनी चुडीवाल यांच्याकडून खरेदी केलेल्या मक्याचे पैसे न देतो ते पैसे आपल्याच मालकीच्या कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे असलेल्या पतसंस्थेत गुंतविले होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान, पंकज चुडीवाल यांनी वेळोवेळी राजरतन अग्रवाल यांच्याकडे पैशासाठी विचारणा केली असता, अग्रवाल हे त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत होते. चुडीवाल यांच्या बिलाचे ३५ लाख ६३ हजार ७८० रूपये व त्यावरील व्याज रूपये ६ लाख ६६ हजार १६० रूपये असे एकूण  ४२ लाख २९ हजार ९४० रूपयांची चुडीवाल यांची फसवणूक झाली. या प्रकरणात आतर व्यापार्‍यांचेही पैशे हडप करुन त्यांच्या रुपयांच्या ठेवी स्वता:च्या नावे राजरतन अग्रवाल यांनी ठेवल्या म्हणून या प्रकरणात ट्रेडको इंडीया प्रा.लि.कंपनी  व इचलकरंजी येथील पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसनिरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत.

आपलं सरकार