Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कंपनीच्या  आवारातून कॉपर वायर लांबविणा दोघांसह स्पेअर पार्ट चोरणाऱ्या टोळीला अटक

Spread the love

औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील किर्दत ऑटोकॉम प्रा.लि. या कंपनीच्या  आवारातून ३ लाख ८८ हजार ८२९ रूपये किमतीचे  कॉपर वायरचे बंडल चोरून नेणाNया दोघांना पोलिसांनी गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरी गेलेले जवळपास १९ बंडल कॉपर वायरचे जप्त केले असल्याची माहिती एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.१) दिली. आकाश प्रल्हाद भालेराव (वय २०, रा.जोगेश्वरी झोपडपट्टी), प्रिâज सुनिल काळे (वय १९, रा.शंकर फाटा, जोगेश्वरी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन ओगले, जमादार वसंत शेळके, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, होनवडजकर, प्रकाश गायकवाड, बाबासाहेब काकडे, फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, बंडू गोरे, दिपक मतलबे, विनोद नितनवरे, सोहळे, एम.पी.कौलमी, प्रदीप कुटे, जयेश साळुंके, कोल्हे आदींच्या पथकाने सापळा रचून कॉपर वायर चोरणाNया दोघांना गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईझेड-६३०५) पोलिसांनी जप्त केली आहे.

स्पेअर पार्ट चोरी करणारी टोळीही  गजाआड

औरंंंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील यशश्री प्रेसकॉम प्रा. लि. या दुचाकीचे सुट्टे भाग बनिवणा-या कंपनीचे शटर उचकटून सुमारे १ लाख १४ हजार ९२९ रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षकासह सहा आरोपींना गुरुवारी (दि. ३१) दुपारी अटक केली. आरोपींना शनिवारपर्यंत (२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी दिले. टेम्पो चालक शेख अय्यास शेख मोहम्मदनुर (वय ३०, रा. आझाद चौक), अब्दुल करीम खान अब्दुल कादर खान (वय ४१), शेख तौफिक शेख रफिक (१९, दोघे रा. किराडपुरा), बैदुखान अब्दुलखान (२५, रा. रा. पंढरपुर), सुरक्षा रक्षक दिलीप रमाकांत झा (वय ४४, रा. बजाजनगर) व सुभाष बाळासाहेब सर्जेराव (वय २७, दोघे रा. बजाजनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी यशश्री प्रेसकॉम प्रा. लि. या कंपनीचे प्रशासकीय अधिकारी रामचंद्रसिंग राजारामसिंग (वय ६०, रा. पडेगाव) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय घेरडे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!