Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह हात-पाय बांधुन ड्रममध्ये कोंबला

Spread the love

कौटुंबिक कलहातून झालेल्या वादानंतर ४५ वर्षीय महिलेचा गळा आवळून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना आरेफ कॉलनीत शनिवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर मारेकरी पतीने तिचे हात-पाय बांधुन मृतदेह घराच्या आवारात असलेल्या ड्रममध्ये कोंबून ठेवला होता. रत्ना पंडित बिरारे (रा.पानवडोद, ता.सिल्लोड, ह.मु.आसेफिया कॉलनी) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पंडित बिरारे असे मारेकरी पतीचे नाव असून तो सिल्लोड मधून बसस्थानकावरुन सिल्लोडचे पोलिस निरीक्षक बोकडे यांनी शनिवारी आज दुपारी २.३०वा. ताब्यात घेऊन  सिल्लोड पोलिस ठाण्यात आणले.

आरोपी पंडित बिरारे याने पत्नीचा खून केल्यावर तो त्याचे साल्लोड येथील नातेवाईक अरुण दांडगे यांच्या कडे लपून राहात होता. पण दांडगेंना पंडितने खून केल्याचे माहित नव्हते. खबर्‍याने पोलिस निरीक्षक सानप यांना आरोपी पंडीत हा सिल्लोडला लपलेला असल्याचे सांगितले व ज्या दांडगेंकडे तो थांबला होता त्यांचा मोबाईल नंबर पोलिस निरीक्षक सानप यांना दिला. सानप यांनी पी.एस.आय. देवकाते यांच्या सोबत पथक देऊन ताबडतोब सिल्लोडला पाठवले. दरम्यान दांडगेंना सतत फोन येत असल्यामुळे बिरारे घाबरुन घराच्या बाहेर पडला. पण पोलिस निरीक्षक सानप यांनी सिल्लोड पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रत्ना बिरारे व तिचा पती पंडित बिरारे हे गेल्या १० ते १२ वर्षापासून आरेफ कॉलनी येथील रहिवासी निवृत्त एअरफोर्स अधिकारी इकरारशेख यांच्या घरी कामाला होते. पंडित बिरारे हे माळीकाम करीत होते तर रत्ना ही घरातील कामे करून शेख इर्शाद यांच्या वयोवृध्द आईची सेवाशुशृषा करीत होती. बिरारे दांम्पत्याला तीन मुली असून तिघींचेही विवाह झाले आहेत. दोघा पती पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. गुरूवारी सायंकाळी रत्ना बिरारे ही टाऊनहॉल परिसरात असलेल्या आपल्या माहेरी गेली होती. त्यावेळी पंडित बिरारे हा देखील तिच्यासोबत होता. गेल्या दोन दिवसापासून रत्ना कामाला आली नव्हती. तसेच शनिवारी सकाळपासून बंगल्याच्या आवारातून कुजलेला वास येत असल्याने इकरार शेख यांनी वास येत असलेल्या ठिकाणी जावून बघितले असता पाण्याच्या ड्रममध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेतीत रत्ना त्यांना दिसून आली.

शेख इकरार यांनी तात्काळ यांची माहिती पोलिसांना आणि रत्नाच्या नातेवाईकांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव बेशुध्दावस्थेत रत्नाला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी रत्नाचा भाऊ विजय जोगदंड याने दिलेल्या तक्रारीवरून पंडित बिरारे विरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसनिरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!