Aurangabad Crime : क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर धाड , ६६ हजारासह ६ जणांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुृगार अड्ड्यावर गुन्हेशाखेने रविवारी दुपारी ३ वा.धाड टाकली.
या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेश(२६) किरण(३४) आणि त्यांचे वडिल गणेश चावरीया(५५) यांच्यासहित विक्रम रिडलाॅन, अनिल लाहोट, विनोद चावरिया या तिघांना ६६ हजार ६२० रु. च्या मुद्देमालासहित अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात गुन्हेशाखेचे विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे यांनी वरील कारवाई पार पाडली

Advertisements

आपलं सरकार