व्याज दारात घट पण , स्टेट बँकेच्या सर्व कर्जावर पुन्हा प्रक्रिया शुल्क करण्याचा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सर्व प्रकारच्या कर्जांवर पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) आकारणी सुरू होणार आहे. गृहकर्ज, वाढीव कर्ज, कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांना दिले जाणारे कर्ज आदी कर्जांसाठी हा बदल लागू आहे, असे बँकेतर्फे सांगण्यात आले.

Advertisements

दसरा, दिवाळीदरम्यान नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टेट बँकेने गेल्या महिन्यात प्रक्रिया शुल्कमाफीची घोषणा केली होती. ही शुल्कमाफी ३१ डिसेंबरपर्यंतच्या नव्या कर्जांना लागू होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र स्टेट बँकेने हा निर्णय अचानक रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपर्यंतच ही सवलत मिळू शकेल.

Advertisements
Advertisements

‘आमच्या बँकेने एक जुलैपासून कर्जाचे व्याजदर हे रेपो दराशी संलग्न केले आहेत. त्यानंतर रेपो दरकपातीनंतर वेळोवेळी आम्ही कर्जांवरील व्याजदर घटवले आहेत. यामुळे पूर्वीच्या तुलनेत आमचे कर्ज स्वस्त झाले आहे,’ असे या बँकेच्या सूत्राने सांगितले.

आपलं सरकार