हृदयद्रावक : हलाखीची परिस्थिती , २३ दिवसांची चिमुकली आणि तिचा गळा घोटणारी माता…

Advertisements
Advertisements
Spread the love

मुलीच्या आजारावर इलाज होत नाही , तिच्या यातना सहन होत नाहीत आणि चांगल्या उपचारासाठी जवळ पैसाही नाही म्हणून विमनस्क अवस्थेतील आईने स्ट्स्ट रडत राहणाऱ्या स्वतःच्या २३ दिवसांच्या चिमुकलीचा गळा घटून तिचा आवाज कायमचा बंद केला. नागपुरातील कामठीत हि ह्रदयद्रावक घटना घडली असून या मातेला नवीन कामठी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २८ ऑगस्टला सदर आरोपी महिला रस्त्यातच प्रसूत झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती त्यावर उपचार होत नव्हता म्हणून हि महिला चिंतीत होती.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रनाळा परिसरात ही घटना घडल्याचे वृत्त आहे. पायल अनिल कनौजे (२२) असे या आरोपी आईचे नाव आहे. पायल ही मूळ मौदा तालुक्यातील अमरोई या गावातील रहिवासी आहे. ती उपचारासाठी तिच्या मावससासूकडे कामठी येथे आली होती.

Advertisements
Advertisements

पायलचा पती अनिल हा कचरा व भंगार गोळा करून ते विकण्याचे काम करतो. त्यांची आर्थिक स्थिती फारच हलाखीची असल्याचे समजते. पायलच्या मुलीला जन्मत:च आरोग्याच्या समस्या होत्या त्यामुळे या चिमुकलीला घेऊन पायल, अनिल आणि पायलची सासू उपचारासाठी कामठी येथे आले होते. कामठीतील रनाळा परिसरात पायलची मावससासू राहते. हे सगळे बुधवारी रात्री मावससासूकडेच थांबले. मुलगी उपचाराला फारशी साथ देत नव्हती आणि सतत रडायची. गरिबीमुळे त्यांच्याकडे उपचारासाठी पैसासुद्धा नव्हता. त्यामुळे पायल त्रस्त होती. अखेर कंटाळलेल्या पायलने स्वत:च्या २३ दिवसांच्या चिमुकलीचा गळा दाबून तिचे रडणे कायमचे थांबविले.

पायल आणि अनिलचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना आर्यन हा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्यानंतर पायल पुन्हा एकदा गरोदर राहिली. २८ ऑगस्ट रोजी तिला प्रसूतिकळा येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनिल तिला ऑटोरिक्षाने सरकारी इस्पितळात घेऊन गेला. पायलला कळा असह्य होऊ लागल्या. ऑटोतून उतरत असतानाच पायल प्रसूत झाली. यामुळे तिची मुलगी रस्त्यावर खाली पडली आणि तिच्या डोक्याला दगड लागल्याने तिला जखम झाली. तिच्या उपचारासाठी पायल आणि तिची सासू पायलच्या मावससासूकडे कामठीला आले होते. येथील सरकारी इस्पितळात तिचा उपचार होता. मात्र, मुलगी उपचारांना फारसा प्रतिसाद देत नव्हती. त्यातच पैसे नसल्याने तिला चांगले उपचार देण्यास असमर्थ असलेल्या पायलची अधिकच कुचंबना होऊ लागली.

गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत चिमुकली रडतच होती. अखेर पायलचा संयम सुटला. तिने गळा दाबून चिमुकलीची हत्या केली. घरासमोरच पांडुरंग गणेर यांचा गायी-म्हशीचा गोठा आहे. या गोठ्यातील उकिरड्यात तिने चिमुकलीला पुरले आणि त्यावर शेण टाकले. यानंतर सकाळ‌ी उठल्यावर ‘मुलगी दिसत नाही’, असे सांगून आरडाओरडा सुरू केली. एवढेच काय तर स्वत:च नातेवाइकांसोबत पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान घराचे दारसुद्धा तोडलेले नसल्याचे दिसून आले. अखेर पोलिसांनी पायलची चौकशी सुरू केली. शेवटी तिने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी पायलवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

आपलं सरकार