Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sting Operation : त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

Spread the love

त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि . ल. धारूरकर यांनी “स्टिंग ऑपरेशन” प्रकरणात अखेर राजीनामा दिला आहे. प्रिंटिंगचे काम दिल्यानंतर एका ठेकेदाराकडून लाच घेत असल्याचा धारूरकर यांचा व्हिडिओ शिक्षक दिनीच व्हायरल झाला होता. स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले होते. हा व्हिडिओ खोटा असल्याचा आणि आपणास बदनाम करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा धारूरकर यांनी केला होता. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एनएसयुआय संघटनेने राज्यव्यापी बंद करण्याचा इशारा दिला होता. अखेर धारूरकर यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला. प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. संग्राम सिन्हा यांनी पदभार स्वीकारला, असल्याची माहिती यूएनआय ने दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख व त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वि. ल. धारुरकर व्हायरल झालेल्या “व्हाईट कॉलर करप्शन ” या नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये लाच घेताना आढळल्याने त्रिपुरासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्रिपुरातील ‘व्हॅनगार्ड न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने हे “स्टिंग ऑपरेशन” करून “शिक्षक दिनी” म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आणला. “हिंदू” या दैनिकानेही या संबंधीचे वृत्त दिले होते.

“व्हायरल” झालेल्या या व्हिडिओत धारूरकर काही  रक्कम संबंधित ठेकेदाराकडून घेत असल्याचे दिसत आहे. ही रक्कम ठेवताना एक व्यक्ती दिसत आहे. तसेच १४ लाख रुपयांच्या कामाचे दहा टक्के या हिशेबाने किती पैसे होतात ? अशी विचारणा करीत आहेत. हे पैसे महिना-पंधरा दिवसाने दिले तरी चालतील असे ठेकेदाराला म्हटले आहे. छपाईच्या कंत्राटासाठी दहा टक्के दराने लाच घेतल्याचे ‘व्हॅनगार्ड’ने उघड केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. विशेषत: औरंगाबाद शहरासह महाराष्ट्रात उत्तम व्याख्याते म्हणून धारूरकर परिचित आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या शैक्षणिक वर्तुळातही हि वार्ता समजताच मोठा हादरा बसला.

दरम्यान छपाईच्या कंत्राटासाठी कुलगुरू धारूरकर लाच घेत असल्याचे उघड करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी “स्टिंग ऑपरेशन” केल्याचा दावा ‘व्हॅनगार्ड’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सेवक भट्टाचार्य यांनी केला होता. धारूरकर मोठा भ्रष्टाचार करीत आहेत, तर आम्ही विद्यापीठाचा लौकिक अबाधित राखण्यासाठी काम करीत आहोत, असे भट्टाचार्य यांनी म्हटले होते. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असून लाचखोरीचे भक्कम पुरावे असल्याने धारूरकर यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील रघुनाथ मुखर्जी यांनी म्हटले होते.  या प्रकरणात आमच्यावर नायायालयीन कारवाई केल्यास आम्ही समर्थ आहोत असे ‘व्हॅनगार्ड’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सेवक भट्टाचार्य यांनी म्हटले असल्याचेही यूएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!