प्रेयसीच्या वाढलेल्या वजनावर प्रियकराने केलेली मस्करी बेतली जीवावर , कात्रीने भोसकले !!

Spread the love

वाढत्या वजनावरुन प्रियकराने चिडवल्यामुळे एका तरुणीने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. विशेष म्हणजे एक आईस्क्रीम खाण्यावरुन सुरु झालेल्या या वादामध्ये वाढत्या वजनावरुन प्रियकराने केलेले वक्तव्य न आवडल्याने रागाच्या भरात प्रेयसीने कात्रीने भोसकून खून केला.

Advertisements

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार हिनान प्रांतमध्ये घडला. १४ ऑगस्ट रोजी हे जोडपे डेटवर गेले होते. त्यावेळी जेवणानंतर प्रेयसीने आणखीन एक आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर प्रियकराने तिला तिच्या वजनावरुन डिवचले. मस्करीमध्ये केलेले हे वक्तव्य त्या तरुणीला चांगलेच झोंबले. तिने समोर असलेल्या कात्रीने प्रियकराला अनेकदा भोसकले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉटेलमधील सर्वच जण गोंधळात पडले. अखेर कोणीतरी पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. काही मिनिटांमध्ये पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी टीम घटनास्थळी दाखल झाली त्यावेळी तेथे हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या तरुणावर प्रथमोपचार केले. तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अती रक्तस्त्राव झाल्याने या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाला. या तरुणीला आपल्या हातून काय घडले हे समजेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तिने घटनास्थळावरुन पाळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला अटक केली आहे.

आपलं सरकार