Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : रामदास आठवलेंना फोन आला , आज शपथविधी …, डॉ. पायल यांच्या मृत्यूचा तपस सीआयडीकडे : दुपारपर्यंतच्या टॉप १० बातम्या :

Spread the love

१. रामदास आठवले यांना अखेर आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला असून आठवले यांना शपथविधीचे अधिकृत निमंत्रण दिले असल्याचे स्वतः रामदास आठवले यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना सांगितले , आज नरेंद्र मोदी यांच्या सोबतच आपण  मंत्रीपदाची शपथ घेणार आहोत हे नक्की मात्र  मंत्रिपद कॅबिनेट कि राज्यमंत्री याचा निर्णय अद्याप समजलेला नाही असेही ते म्हणाले. दरम्यान औरंगाबादच्या रिपाइंचे शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी कळविले आहे कि, सर्व कार्यकर्त्यांनी आठवलेंच्या मंत्रिपदाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भडकलंगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन केलेआहे. तर काही कार्यकर्ते बाबुराव कदम, मिलिंद शेळके दिल्लीत पोहोचले आहेत.

२. मुंबईः डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

३. हैदराबादः वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ.

४. मुंबईः काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर.

५. उच्च वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती.

६. शपथविधी सोहळ्याआधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात तब्बल एक तास चर्चा.

७. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मारले गेलेले ५४ भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबातील सदस्य मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचले.

८. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

९. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही प्रवक्त्याला वृत्त वाहिन्यांवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, असा निर्णय काँग्रसने घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. इतकेच नाही, तर देशातील वृत्तवाहिन्या आणि संपादकांनी चर्चेच्या कार्यक्रमांममध्ये कोणत्याही काँग्रेसच्या प्रतिनिधीला पाचारण करू नये अशी विनंतीही काँग्रेस पक्षाने केली आहे.

१०. मोदींचा शपथविधी सोहळाः शिवसेनेचे अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेतीलः संजय राऊत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!