Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

1. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, पत्रकार, डॉक्टर सौदामिनी राव यांचे बावधन येथे राहत्या घरी निधन, त्या ८२ वर्षांच्या होत्या

2. पुणेः येरवडा येथील राज्य विक्री कर अधिकारी माने यांना १ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

3. पुणेः बदलीसाठी आरोग्य सेविकेकडून २० हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) झडती, १ कोटी ७१लाख ७६,५०० रूपयांची मालमत्ता तपासात उघड

4. आंध्र प्रदेशः वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू सहभागी होणार नाहीत

5. पुणेः बारावीत नापास झाल्याने ऋषिकेश पांचाळ (१७, रा. सांगवी) या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

6. नाशिकः गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावर पहाटेच्या सुमारास झाडावर कार आदळून एक ठार

7. औरंगाबाद: डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची एसएफआयची मागणी, विद्यार्थ्यांनी घेतली विद्यापीठात शोकसभा

8. राजस्थानः अल्वरमधील सामूहिक बलात्कारतील पीडित महिलेला पोलिसात नोकरी, मंत्रिमंडळाने दिली नियुक्तीला मंजुरी

9. बीड जिल्हा रुग्णालयात आग; कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रं खाक

10. जालना : अंबड शहराजवळ ट्रक – दुचाकीचा अपघात; तिघांचा मृत्यू

11. औरंगाबाद : पाण्याच्या टँकरची जीपला धडक; १४ जण जखमी

12. औरंगाबाद : ज्यूब्लिपार्क येथे ट्रॅकटरने महिलेला चिरडले, महिलेचा मृत्यू

आपलं सरकार

Click to listen highlighted text!