Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेचा विषय : ठिकठिकाणी EVM मिळत असल्याच्या तक्रारी आणि निवडणूक आयोगाची भूमिका

Spread the love

सध्या देशभरात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवरून उलट सुलट चर्चा सुरु असून या प्रकरणात २३ मेरोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी मंगळवारी २१ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. यादरम्यान नेत्यांनी EVM संबंधी निवडणूक आयोगाकडे चिंता व्यक्त केली आहे.  या प्रकरणात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही आपले मत दिले असून ईव्हीएमची  जबाबदारी निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. या सर्वप्रकरणात बीबीसी मराठीने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले  वृत्त देत आहोत.

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण:

1. गाझीपूर – उमेदवारांनी कंट्रोल रुमच्या देखभालीवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यावर तोडगा काढण्यात आला आहे.

2. चंदौली – काही लोकांनी आरोप केला होता की, EVM मशीन प्रोटोकॉलच्या अंतर्गत सुरक्षित आहेत.

3. डुमरियागंज – EVM मशीन सुरक्षित आहेत. सर्व आरोप चुकीचे आहेत.

4. झाशी – राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीत EVM मशीन्सला सील करण्यात आलं आहे. इथं काही एक समस्या नाहीये.

निवडणूक संपल्यानंतर आणि विशेष करून सोमवारनंतर जागोजागी EVM मशीन मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. जिल्हा प्रशासन दबावाखाली मतमोजणीत EVM बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे.

जागोजागी EVM आणि VVPAT असलेल्या वाहनांची माहिती सोशल मीडियावर दिली जात आहे. EVM मशीन बदलल्या जात आहे, असा त्यात दावा केला जात आहे. याप्रकारच्या बातम्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या झाशी, चंदौली, गाझीपूर, डुमरियागंजमधून येत आहेत.

याप्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, EVM मशीननं भरलेले ट्रक पकडले जात आहेत.

त्या म्हणतात, “देशभरात ट्रक आणि खासगी वाहनांमध्ये EVM मशीन पकडले जात आहेत. या मशीन कुठून येत आहेत, कुठे जात आहेत? कधी, कोण आणि कशासाठी त्यांना घेऊन जात आहे? पूर्वनियोजित प्रक्रियेचा हा भाग तर नाहीये ना? निवडणूक आयोगानं यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. ”

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया शेयर केल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ट्वीटरवर एक व्हीडिओ शेयर केला आहे.

ते म्हणतात, “प्रत्येक उमेदवाराला स्ट्राँग रूमवर देखभाल करण्याण्यासाठी तीन कलेक्शन पॉईंटवर आठ-आठ तासांसाठी एका एका व्यक्तीला पास जारी करण्यासाठी निर्धारित करण्यात आलं आहे. पण काही जागांवर कधी तीन तर कधी पाच लोकांना पास जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण यासाठी प्रशासनानं असहमती दाखवली आहे.”

झाशीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी ट्वीटरवर माहिती दिली आहे.

त्यांच्या मते, “झाशीमध्ये एकाच पोलिंग पार्टी असते. तिथंच स्ट्राँग रूम निर्माण केले जातात आणि तिथंच कलेक्शन पॉईंट असतो. गरोठा आणि मऊ खूप लांबचे विधानसभा मतदारसंघ असल्यामुळए पोलिंग पार्टीला तिथून यायला विलंब झाला होता. त्यामुळे स्ट्राँग रूम सील होण्यासाठी वेळ लागला होता. इथंही सकाळी 7 ते 7.30 पर्यंत आम्ही सर्व EVM मशीन स्ट्राँग रुमध्ये ठेवल्या होत्या. त्यांचं सीलिंग अधिकृत निरीक्षकांनी केलं होतं. या निरीक्षणादरम्यान व्हीडिओ बनवण्यात आला होता. आणि हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर झालं होतं. ”

[ वृत्त सौजन्य :  https://www.bbc.com/marathi ]

आपलं सरकार

Click to listen highlighted text!