It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

Spread the love

1. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपला, १९ तारखेला ५९ मतदारसंघांसाठी होणार मतदान

2. ८ जागा ,२० जागा ,३०-३५ जागा मिळवणारी लोकं देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महागठबंधनवर उत्तर प्रदेशातील चांदोली येथे टीका

3. मायावती, मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू मोदींना पाठिंबा देतील, असं वाटत नाहीः राहुल गांधी

4. भगवा दहशतवाद म्हणून काँग्रेसने  हिंदू संस्कृतीला बदनाम केले आहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी देशाची माफी मागितली पाहिजेः अमित शहा

5. राज्यातील ४३३१ गावांसाठी ५४९३ टँकरनं पाणीपुरवठा, चारा छावण्यांसाठी १६२ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती

6. जीएसटी आणि नोटबंदीमुळं ५ हजार कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

7. पुणे: हायकोर्टाच्या आदेशानंतर जे. एम. रोडवरील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असमल शब्बीर शेख एसटीएससमोर शरण, कायदेशीर प्रक्रियेनंतर ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी

8. महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरला कधीच माफ करणार नाही: नरेंद्र मोदी

9. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ट्विटरवरून टीका : “मौन किबात”

10. चेन्नई विमानतळावर तस्करीचे ६ किलो सोने जप्त

11. अहमदनगर: डॉ. अशोक विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. २० मे पासून विखे करणार लोणी येथे उपोषण

12. मुंबई: बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटाळला

13. औरंगाबाद: पैठण तालुक्यातील आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात कालपासून ठिय्या

14. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणणारे देशद्रोही, त्यांच्यासह पक्षाला देश माफ करणार नाही: मेधा पाटकर

15. लैंगिक छळाचा आरोप; अभिनेता नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे वृत्त चुकीचे: तनुश्री दत्ता

16. गडचिरोली : भामरागड-हेमलकसा मुख्य रस्त्यावरील टी-पाईँटवर नक्षल्यांनी लावलेले बॅनर नागरिकांनी जाळले, बंद पाळण्याचे आवाहन धुडकावले

17. अमरावती- नोकरी न लागल्याने तरुणीची आत्महत्या

18. बुलडाणा: खामगावमधील संजीवनी कॉलनीत भरदिवसा 27 वर्षाच्या युवतीचा खून