भाजपचे सहयोगी रामदास आठवले यांचा मायावतींना विवाहाचा सल्ला !! मोदींच्या वतीने दिले आठवलेंनी उत्तर

Advertisements
Spread the love

राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पत्नीला सोडलं, ते महिलांचा सन्मान कसा करणार? असा प्रश्न विचारत मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनी मायावती यांना अद्याप या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिलं नसलं तरी भाजपचे सहयोगी रामदास आठवले यांनी मात्र या मुद्याचे उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मायावती यांना थेट विवाह करण्याचा सल्ला दिला आहे .

मायावती यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना  रामदास आठवले म्हणाले कि ,मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मायावती यांनी लग्न केले तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असंही आठवले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लग्न झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावतींचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करायला नको होती असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply