It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा राहिला तेंव्हा संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते : प्रियांका गांधी

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

आपला देश पारतंत्र्यात होता, सगळ्या देशात स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. त्यावेळी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. पंजाबमधल्या भटिंडा या ठिकाणी त्या बोलत होत्या. पंजाब जेव्हा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला होता त्यावेळी RSS अर्थात संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करत होते अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

‘चौकीदार चोर है’ या घोषणा काँग्रेसच्या सभेत दिल्या जात आहेत. तर प्रियंका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनासोबत केली. २३ मे रोजी दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिलं आहे. एकमेकांवरचे हे आरोप प्रत्यारोप थांबत नसतानाच आज पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. संघाचे लोक स्वातंत्र्य लढा सुरू असताना इंग्रजांची चमचेगिरी करत होते अशी टीका त्यांनी भटिंडामधल्या सभेत केली आहे .

Advertisements


Advertisements

विविधा