श्री मोदी, जो शिव्या खाण्याचे काम करतो शिव्या त्यालाच दिल्या जातात : मायावती यांचे नरेंद्र मोदी यांना प्रतित्युर

Advertisements
Spread the love

विरोधी पक्षाचे लोक  नवीन शिव्या देतात असा गळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढल्यावर त्यांच्या या वक्तव्याचे उत्तर देताना बहुजन पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पुन्हा मोदींचा समाचार घेतला आहे . गोरखपूर येथील आपल्या भाषणात मायावती म्हणाल्या कि , श्री मोदी , आपण प्रचार सभेत हे सांगत आहेत कि , विरोधी पक्षाचे लोक मला रोज शिव्या देत आहेत . हे सर्व स्वाभाविक आहे कारण कोणीही कोणाला विनाकारण शिव्या देत नाही . जो शिव्या खाण्याचे काम करतो लोक शिव्या त्यालाच देतात . श्री मोदी यांनी ही गोष्ट लक्षात ठेऊन वाटचाल केली पाहिजे.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर निशाणा साधत असताना, विरोधकही मोदींवर आक्रमकपणे हल्ला करत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

दरम्यान या आधी अलवर सामुहिक बलात्कार प्रकरणी राजकारण केलं जात असल्याचा आरोप  करून मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप  करताना  , आपल्या पत्नीला  ज्यांनी राजकारणासाठी सोडले ते इतर महिलांचा सन्मान कसा करणार? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला केला होता . इतकेच नव्हे भाजपा नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या बायका घाबरतात अशा शब्दांत मायावतींनी जळजळीत टीकाही केली.

Leave a Reply