Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रियकराबरोबर तिचा एका मांजरावरही जीव जडला आणि ते दोघेही तुरुंगात गेले …. !!

Spread the love

हि बातमी आहे एका डॉलर नावाच्या मांजराची  आणि प्रियकर – प्रेयसीची !! या प्रेयसीचा प्रियकराबरोबर एका क्युट पर्शियन मांजरावर जीव जडला . काहीही  तेवढं ते मांजर मला आणून दे असा हट्टच या प्रेयसीनं आपल्या प्रियकराजवळ धरला . आणि त्याने ते मांजर शेवटी पळवून आणलं खरं पण मांजराच्या मूळ मालकिणीने थेट पोलीस ठाणे गाठून आपले मांजर चोरीला गेल्याची फिर्याद दिली . पोलिसांनी शोध सुरु केला तेंव्हा सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस त्या प्रियकर प्रेयसीच्या घरात पोहोचले आणि चोरीला गेलेलं मांजर हस्तगत करून मूळ मालकिणीच्या हवाली केलं तर चोरीच्या आरॊपवरून प्रियकर प्रेयसीला तुरुंगात जावं लागलं .

सविस्तर बातमी अशी कि ,  हर्षल गजानन मानापुरे (३१) रा. मानकापूर आणि विलेशा चैत्राम बन्सोड रा. ताजनगर झोपडपट्टी, नागपूर  अशी या प्रकरणातील प्रेमीयुगुलाची नावे आहेत. डॉ. अंजुमन सय्यद (४२) रा. ताजनगर असे फिर्यादीचे नाव आहे. कॅटरिंगच्या कामातून हर्षल व विलेशाचा परिचय झाला. कालांतराने हे प्रकरण प्रेमापर्यंत पोहोचले. अनेकदा ताजनगर परिसरात दोघे एकाच घरात ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे. विलेशा ही परिसरातून ये-जा करीत असताना डॉ. अंजुमन यांच्याकडे वेगवेगळया प्रजातीच्या मांजरी दिसायच्या. त्यापैकी एक तिला खूप आवडायची.

डॉ. अंजुमन यांच्या घरासमारून जाताना ती थांबून मांजरीला बघत बसायची. प्रियकरासोबतच तिचे त्या मांजरीवरही प्रेम जडले. तिने प्रियकर हर्षलकडे तसे मांजर हवे, अशी मागणी केली. त्याने त्या मांजरीसंदर्भात चौकशी केली असता ती पर्शियन मांजर असून तिची बाजारातील किंमत ३० हजार असल्याचे त्याला समजले. मांजर विकत घेण्यासाठी त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. त्याने काही दिवस तो विषय टाळला. पण, विलेशाच्या मनातून मांजर जात नसल्याने तीने आपला हट्ट कायम ठेवला. अखेर शुक्रवारी संध्याकाळी त्याने डॉ. अंजुमन यांच्या घरातून मांजर पळवून विलेशाच्या हाती सोपविले. डॉ. अंजुमन घरी परतल्या असता त्यांना ती मांजर दिसली नाही. त्यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मिश्रा, संतोष राठोड, प्रमोद दिघोरे, राजेश वरटी आणि रोशनी यांनी तपास केला. त्यावेळी डॉ. अंजुमन यांनी एका मुलीवर शंका उपस्थित केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तरुणीला शोधून काढले. विलेशाने मांजर चोरल्याचे नाकारले. तिचा प्रियकर हर्षल यालाही रात्री बोलवण्यात आले. त्यानेही काहीच सांगितले नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!