Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधींची दिलगिरी : विमान नादुरुस्त झाल्याने दिल्लीला परतावे लागले , सर्व सभांना उशीर ….

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात आज सकाळी पाटणाकडे जाताना बिघाड झाला. त्यामुळं राहुल यांना तातडीनं दिल्लीला परतावं लागलं. राहुल यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. विमानातील बिघाडामुळं त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिरानं सुरू होणार असं सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार होत्या. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानानं जात होते. सकाळी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!