खळबळजनक : नाशिकच्या पंचवटीत महिलेला पेटवून दिले , पुरुषही भाजला

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिकमधील पंचवटी भागात एका महिलेला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला जाळणारा पुरूषही किरकोळ भाजला आहे. हा पुरुष नेमका कोण आहे, तसेच या मागचे कारण काय आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. या घटनेमुळे पंचवटीतील टकलेनगर भागात खळबळ उडाली आहे.
पंचवटीमधील टकलेनगर येथील हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये आज पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत महिलेच्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या घटनेबाबतचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार