Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : जरांगे पाटील गहिवरले !! उद्या सकाळपर्यंत येणार यादी …. कुठे लढणार आणि कुणाला पाडणार ?

Advertisements
Advertisements
Spread the love

जालना : सत्ताधाऱ्यांना मी सोडणार नाही, समाजाला संपवणाऱ्याना संपवणार आहोत. मी बदला घेणार, मी नेत्या सारखं भेसळ जगणर नाही. माझं कुटुंब कुठे आहे हे सुद्धा मला माहिती नाही, माझं मुल, माझा बाप कुठं आहे,हे मला माहिती सुध्दा नाही. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला सोडणार नाही. यांना पायाखाली तुडवणार. समाजाची मान ताठ होईल असे वागा असे आवाहन करताना मनोज जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले !! जरांगे पाटील यांचा निर्णय ऐकण्यासाठी जवळपास ३० ते ४० हजार लोक आंतरवाली सराटीत उपस्थित असल्याचे सांगून जरांगे पाटील म्हणाले की , इथली गर्दी कमी करा. आपले नाव यादीत नसेल तर स्वतःहून अर्ज परत घ्या. फोनची वाट पाहू नका. सर्वांनी आपापल्या शहराकडे परत जा. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठा , दलित आणि मुस्लिम समाज मिळून राज्यात सध्या 15 ते 20 जागा लढविण्यावर चर्चा झाली असून उद्या सकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल . आपले मतदान जास्त असेल त्याच मतदारसंघ लढायचे आहेत. दलित -मुस्लिम सोबत आहेत. मात्र, जिथं आमची ताकद आहे, त्याच जागा लढणार आहोत. एका जिल्ह्यात एक किंवा दोन लढणार आणि बाकीच्या पाडणार आहोत. 15-20 जागा लढवणार, मुस्लिमांच्या दोन तीन , दलितांच्या दोन तीन असतील असा अंदाज आहे. अजून एक दोन किचकट प्रश्नांवर आमची चर्चा सुरू आहे. आमच्या गोरगरीब मुलांना. त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाही. कोणीही बळच हट्ट करू नका.

Advertisements

“आमच्या शक्ती वरती लढता येतील, त्या मतदारसंघाची आम्ही सकाळपासून चर्चा केली. राज्यात पहिल्यांदा उमेदवारांना प्रत्यक्ष बोलून मतदारसंघ विचारले असतील. Sc,st जागेवर उमेदवार देणार नाही. जिथे उमेदवार देणार नाही, तिथं विरोधक असलेल्या पाडायचं. जिथे उभे करायचे नाही तिथे आपल्या विचाराच्या उमेदवाराला बॉण्ड आणि व्हिडिओ घेऊन त्याला पाठिंबा द्यायचा आहे. (तो व्हायरल करणार नाही)”, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाय आज रात्रीत उमेदवारांची घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी स्पष्ट केलं.

Advertisements
Advertisements

लढवले जाणारे मतदारसंघ

बीड
मंठा
परतूर
फुलंब्री
पाथरी
हाथगाव
धाराशीव-कळंब
दौंड
पर्वती
पाथर्डी
कोपरगाव
शेवगाव
करमाळा

जी नावे नसतील ते उमेदवार पडायचा निर्णय झाला आहे.

लढवायचे ठरले परंतु उमेदवार निश्चित होणे बाकी….

कन्नड
हिंगोली
वसमत
गंगाखेड
लोहा
कंधार
तुळजापूर
भूम-परांडा-वाशी
पाचोरा
माढा
धुळेश्वर
निफाड
नांदगाव

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!