ईव्हीएम चोरी प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी निलंबित

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : पुरंदर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांनी तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, केंद्रीय निवडणूक आयोगाला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements

दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनीही याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएम चोरीच्या या प्रकरणांमध्ये आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 2 चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट जेजुरी येथून अटक केली आहे.

नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

सुट्टीचा फायदा घेऊन केली चोरी

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार व रविवार असे दोन दिवस तहसील कार्यालयात सुट्टी होती.

सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तुटल्याचे समजले. या ठिकाणाहून ईव्हीएम मशिन चोरीला गेल्याचे उघडकीस येताच गोंधळ उडाला.

पुण्यातील काँग्रेसने ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

पुण्यातील काँग्रेस नेते, प्रदेश सरचिटणीस ॲड अभय छाजेडा आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपीएटी स्लिपवर मतदानाची वेळ आणि तारीख प्रसिद्ध करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

यासंदर्भात आज सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

 

धार्मिक कार्यक्रमात तीन हजारांहून अधिक भाविकांना झाली विषबाधा

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!