अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंहच्या हत्याराला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

जालंधर (Panjab) – पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या एका ऑटोरिक्षा चालकाने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दलबीर सिंहचा मृतदेह बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्याच्या कडेला सापडला होता, तसेच त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही देखील आरोपीने पळवून नेली होती.

Advertisements

दलबीर सिंह हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि 2000 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय दलबीर सिंह यांचा 1 जानेवारी रोजी पंजाबच्या जालंधरजवळ मृतदेह आढळून आला होता. याठिकाणी त्यांची ड्यूटि सुरू होती, हे ठिकाण त्यांच्या मूळ गावापासून फक्त 8 किमी अंतरावर होते.

Advertisements
Advertisements

जालंधरचे पोलीस आयुक्त स्वपन शर्मा म्हणाले की, ड्रायव्हरचे नाव विजय कुमार असून त्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा चालकाला दलबीर सिंहने त्याच्या गावी सोडण्यास सांगितले होते परंतु ड्रायव्हरने दलबीर सिंहशी भांडण केले, वाद वाढला व त्यानंतर आरोपीने दलबीर सिंहचे सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावले आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली.

पोलिसांनी सांगितले की आरोपी कुमार हा अंमली पदार्थांचे व्यसनी आहे आणि त्यांनी त्याच्याकडून दलबीर सिंह सर्व्हिस रिव्हॉल्वर जप्त केले आहे. आरोपींवर यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी दलबीर सिंगचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आम्हाला सापडला. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला ते जालंधरपासून 6-7 किमी अंतरावर आहे. आम्ही या प्रकरणी विजय कुमार या ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. शर्मा यांनी एक वृत्तात म्हटले आहे.

तो पुढे म्हणाले, ड्रायव्हरने पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या गावी सोडण्यास नकार दिला ज्यामुळे हाणामारी झाली. वादात विजयने दलबीर सिंहकडून सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून घेतले आणि त्याच्या डोक्यावर गोळी झाडली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी झाल्यानंतर त्यांनी त्याला बसस्थानकाजवळ सोडल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. दलबीर सिंहच्या पाय चिरडण्यात आला होता आणि त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा होत्या, त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला हे हिट अँड रन प्रकरण असल्याचे मानले होते.

अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!