पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला फोटोशूट का केले, अमित शहांनी दिले स्पष्टीकरण

Advertisements
Advertisements
Spread the love

लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. काँग्रेसने मोदींच्या या फोटोशूटवर टीका केली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या फोटोशूटमागचे कारण सांगितले आहे.

Advertisements

मोदींनी कोणते फोटोशूट केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली. यावेळी त्यांनी निवांत समुद्रकिनाऱ्यावर एक दिवस घालवला. यावेळी त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. तसेच मोदींनी लक्षद्वीप बेटाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Advertisements
Advertisements

काँग्रेसने काय केली टीका?

काँग्रेसने ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. मणिपूर आठ महिन्यांपासून जळत आहे, अजूनही लोक मारले जात आहेत. भारतीय नागरिक मारले जात आहेत आणि त्यांना बेघर केले जात आहे, बहिष्कार झाले आहेत. पण भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? काँग्रेसने ट्विट करत म्हटलं आहे की, आपण स्वतः बघा, असे कोंग्रेसने ट्वीट केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मजा करत आहेत, बीचवर चांगली फोटोग्राफी केली जात आहे. वेगवेगळ्या पोशाखात फोटो काढले जात आहेत. अप्रतिम पोझ दिल्या जात आहेत. कधी किनाऱ्यावर बसून तर कधी समुद्राच्या लाटांशी खेळण्याचा आनंद घेत आहेत. जबाबदारीपासून पळून जाण्याची कला पंतप्रधान मोदींनी पार पाडली आहे.

शहांनी सांगितले मोदींच्या फोटोशूटमागचे कारण?

लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रकिना-यावर फोटोशूट करून घेतले आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे अमित शहांच्या या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.

शाह यांनी ट्विटमध्ये म्हणाले की, “लक्षद्वीपमध्ये अप्रतिम समुद्रकिनारे, निळ्या पाण्याची तलाव आणि बरेच काही आहे. त्यात जागतिक पर्यटन स्थळ बनण्याची अफाट क्षमता आहे. लक्षद्वीपला प्रोत्साहन देण्यासाठी फोटोशूट केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. यामुळं पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि त्यामुळे तिथल्या लोकांचे जीवनमान उंचावेल.

 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रूटने 2 तासांचा प्रवास अवघ्या 35 मिनिटांत संपेल…

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!