Weather update | या आठवड्यातही राज्यामध्ये पावसाळी वातावरण कायम

महाराष्ट्रातील अवकाळी पावसाची स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. जोपर्यंत दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणाली बदलत नाही किंवा नामशेष होत नाही, तोपर्यंत अवकाळी पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच या आठवड्यातही राज्यामध्ये पावसाळी वातावरण कायम असून विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवारी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी यलो अलर्ट असून ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातही बुधवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र राजधानी मुंबईत पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहील अशी शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली येथे बुधवारी आणि काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर गुरुवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचे सातत्य कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे मंगळवारपासून तर वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती आणि अकोला येथे बुधवार आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतरही मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो. दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणाली जोवर कायम राहील तोवर महाराष्ट्रातील अवकाळीची स्थिती निवळण्याची शक्यता नाही.
Political News | कर्नाटक निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिला भाजपला दणका
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
