Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SanjayRautNewsUpdate : खा. संजय राऊत यांना दिलासा नाहीच , १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : कथित पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने  त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते परंतु न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलासा दिला नाही.


अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. दरम्यान संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.

Advertisements

काय आहे आरोप ?

खासदार संजय राऊत यांच्यावर पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात  सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा आरोप  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!