HingoliNewsUpdate : हिंगोलीत “साहेबां”च्या दालनाचे “सेवका”च्या हस्ते उदघाटन !!

प्रभाकर नांगरे / हिंगोली : हिंगोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त यांचे दालनाचे शुशोभिकरण करण्यात आले असून सदर दालनाचे उद्घाटन कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी दत्ता कुंभार यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी आपले मत व्यक्त करत कार्यालयात काम करत असतांना 9 ते 10 तास आपण कार्यालयात असतो. त्यामुळे कार्यालय सुंदर, स्वच्छ असेल तर आपले आरोग्य चांगले राहते त्यामुळे कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे कार्यालयात स्वच्छता, सुरक्षा करण्याचे काम करत असतात त्यांच्या मनात कार्यालयाप्रती सद्भावना वाढीस लागावी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पण कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी, असे मनोगत शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री. शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली श्री. सिध्दार्थ गोवंदे- प्रकल्प अधिकारी बार्टी, श्री. श्रीकांत कोरडे-सहाय्यक लेखाधिकारी श्री. मनिष राजुलवार-समाज कल्याण निरीक्षक, श्री. बालाजी टेभुर्णे- समाज कल्याण निरीक्षक, श्री. सुनिल वडकुते- समाज कल्याण निरीक्षक, श्री. मोतीराम फड, श्री. गोविंद पवार, श्री.बाळू पवार, श्री. नितीन राठोड, श्री. शेषराव जाधव, श्री. सुरेश पठाडे, श्री. अशोक इंगोले, श्री. प्रफुल पट्टेबहादुर, श्रीमती पल्लवी गिते, श्रीमती सुलोचना ढोणे, श्रीमती मिनाक्षी बांगर, श्री. ज्ञानेश्वर कोरडे, श्री. शुभम यादव, श्री. नागनाथ नकाते, श्री.रवि कोळी, श्री.दिपक कांबळे, श्री.संदिप घनतोडे, श्री. रितेश बगाटे, श्री. गजानन कोरडे, श्री. सखाराम चव्हाण, श्री. राहुल कांबळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.