AurangabadCrimeUpdate : दोन गुटखा डिलर सहित तिघांना २१ लाखांच्या मुद्देमालासह अटक

औरंगाबाद- मुकुंदवाडी भागातून गुटख्याचे दोन ठोक व्यापारी एका सहकार्यासहित २१ लाख ३७ हजारांच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेने विशेष अभियाअंतर्गत अटक केले आहेत अशी माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी दिली.
शेख हबीब शेख मदन (३६) शेख यासीन शेख फत्तू(४३)व मोहसिन मुमताजखान(२५) सर्व रा.मुकुंदवाडीअशी अटक आरोपींची नावे आहेत.तर सुगंधी तंबाखू पुरवठा करणारा अश्पाक तांबोळी रा.जालना याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हबीब याच्या घरात गुटखा साठवण्यात आला होता. आरोपींच्या ताव्यातून एक स्वीफ्ट डिझायर, व गुटखा जप्त करण्यात आला.
पीएसआय कल्याण शेळके, सहाय्यक फौजदार रमाकांत पटारे,पोलिस कर्मचारी रमेश गायकवाड, विजय निकम, चंद्रकांत गवळी,राजेंद्र साळुंके, नितीन देशमुख यांनी पार पाडली. उपायुक्त गिते म्हणाल्या की, पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशानुसार नशेच्या गोळ्या, गुटखा, व अन्य अवैध धंद्यांवर विशेष अभियानांतर्गत कारवाया करण्यात येणार आहेत.