MarathawadaNewsUpdate : पोलीस हवालदाराची बदलीसाठी थेट आत्मदहनाची धमकी

जालना : माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यामुळे जालना जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान कुलकर्णी यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली होती. त्यात सायंकाळी त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओद्वारे बदलीसाठी आत्मदहनाचा इशारा दिलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत . कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी बदलीचा विनंती अर्ज केला होता. मात्र, आतापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही आपले त्यात नाव नसल्याने गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवला. त्यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला.