AurangabadCrimeUpdate : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,मजूर अटकेत

औरंगाबाद – बाहेर गेलेल्या आईकडे सौडतो असे म्हणंत महेशमाळ परिसरात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या मजूराला छावणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
रवि दराडे (४०) रा.मिटमिटा असे अटक आरोपीचे नाव आहे.काल सकाळी ११ते रात्री ९च्या वेळेत हा गुन्हा घडला. पिडीत मुलीची आई देवाचा कौल लावण्यासाठी मंदीरात गेली होती. म्हणून तिच्यामागे मुलगी गेली पण तिला रस्ता उमजला नाही.म्हणून आरोपी रवी दराडे याने थापा मारत पिडीत मुलीला महेशमाळ परिसरात नेऊन बलात्कार केला.
आरोपी दराडे आणि मुलीचे वडिल एकाच वीटभट्टीवर काम करंत असल्यामुळे मुलीनेही आरोपीसोबंत जातांना कसलेही आढेवेढे घेतले नाही.दरम्यान पिडीतेची आई घरी आल्यावर घरी मुलगी दिसंत नसल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली.पण मुलगी दराडे बरोबर गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.रात्री ९वा.खरा प्रकार कळल्यानंतर आज पहाटे छावणी पोलिस ठाण्यात दराडे विरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी रवि दराडेला अटक केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हिवराळे करंत आहेत.