Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीची मोठी कारवाई

Spread the love

मुंबई : राज्याचे  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीने  समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीने  मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीने  जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.


आत्तापर्यंत अनिल देशमुख यांना  तीन वेळा ईडीने  चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दिवसभर ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते.

दरम्यान ईडीने  आज जप्त ककेलेल्या  ४ कोटी २० लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील १ कोटी ५४ लाख रुपयांचा फ्लॅट आणि २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या ४ कोटी ७० लाख रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे  भासवले , असे  ईडीकडून सांगतण्यात आले  आहे.

दरम्यान आज जप्त करण्यात आलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर असून २००४ मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचं विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आले. अनिल देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. तसेच, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात आहे, असं देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!