AurangabadCrimeUpdate : गेल्या तीन महिन्यांपासून तलवारींचा व्यापार,चार अटकेत, दोन खरेदीदार फरार

औरंगाबाद : ५० तलवारी लाकडी खेळण्यांच्यानावाखाली मागवणार्या दानिशखानने ८शस्रे यापूर्वी विक्री केलेल्या चौघांना जिन्सी पोलिसांनी पकडले.तर दोन खरेदीदार फरार झाले.
जिन्सी पोलिसांनी तलवार खरेदीदारराशेद सालमीन दीप (२२) धंदा शिक्षण,शेख अरबाज शेख शेरु (२१)धंदा मजुरी,महंमद फरदीन मोईन बागवान (१९) तिघेही रा.इंदीरानगर बायजीपुरा तर फैजान हारुन कुरेशी (२०)रा.चिकलठाणा अशी अटक आरोपींची नावे आहेत.तर सय्यद मुजाहेद सय्यद हबीब, व अबुजरखान जफरखान हे दोन खरेदीदार फरार झाले आहेत.त्यांच्या घरातून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान हा शस्रसाठा करण्यामागे कोणताही घातपात करण्याचा आरोपींचा विचार नसून केवळ समारंभात किरायाने देण्याच्या उद्देशाने खरेदी केल्याचा प्राथमिक जबाब आरोपींनी दिल्याचे केंद्रे यांनी सांगितले.त्याच प्रमाणे प्रमुख आरोपी दानिशखान हा गेल्या तीन महिन्यांपासून हा व्यवसाय करत असल्याची माहिती एपीआय अजबसिंग जारवाल यांनी दिली.या प्रकरणाची कसून चौकशी करंत असल्याचा खुलासा जारवाल यांनी केला.
जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल तलवारीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढंत असल्यामुळे सायबर पोलिसठाणे, आर्थिकगुन्हेशाखा तसेच गुन्हेशाखेची तांत्रिक मदत घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.या कारवाईत गुन्हेशाखा सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक आघाव, एपीआय अजबसिंग जारवाल, पीएसआय ठाकूर, शेख सरवर , शेख हारुण,पोलिस कर्मचारी अय्युब पठाण, भाऊसाहेब जगताप,संतोष बमनात, सुनिल जाधव यांनी सहभाग घेतला होता.
क्रांतीचौक पोलिसांकडूनही जुना शस्रसाठा जप्त
क्रांतीचौक पोलिसांनी गरमपाणी भागातून रेकार्डवरच्या एका गुन्हेगारासहित अन्य एकाला तलवारीसहित सोमवारी मध्यरात्री १२वा.अटक केली.
शेख इर्शाद उर्फ इशू पिता सईद व शेख जाकेर शेख ऐतेसमोद्दीन अशी अटक आरोपींची नावे आहेत.यातील इशू सईद हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याने जाकेर च्या मदतीने स्वसंरक्षणासाठी ८तलवारी जमवल्याचे प्राथमिक पोलिस तपासात उघंड झाले आहे. पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी सांगितले.वरील कारवाई पीएसआय संदीप शिंदे यांनी पार पाडली.