Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : चिंताजनक : राज्यात आता फक्त 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्यात एका बाजूला कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे राज्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता फक्त 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

Advertisements

राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना संपूर्ण माहिती दिली. शिंगणे म्हणाले कि , ‘मी आज मुंबई आणि राज्यात  इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांची माहिती घेतली. पुढील सहा ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या आहे, राज्यात कोरोना सुरू झाल्यापासून रक्त पुरवठा कमी झाला आहे’ अशी माहिती शिंगणे यांनी दिली. तसंच, रक्तसाठा कमी होत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी लोकांना आवाहन केले आहे, नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. राजकीय नेत्यांनीही त्यांचे वाढदिवस साजरा होत असताना रक्तदान शिबिर आयोजित करावे, असं आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!