जिन्सी आणि वाळूज औद्योगिक पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करंत तिघांना अटक केली आहे.

औरंगाबाद – जिन्सी आणि वाळूज औद्योगिक पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करंत तिघांना अटक केली आहे.
लाॅकडाऊनच्या काळात रेकाॅर्डवरील गुन्हेगार अशौक गुळवे(२६) रा.पवननगर रांजणगाव आणि त्याचा साथीदार कृष्णा भास्कर चक्रे यांनी १५ अॅंड्राॅईड मौबाईल हॅंडसैट चोरी करुन अशोक गुळवे च्या घरी असल्याची खबर वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार गुळवे ला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुळवे व चक्रे ला अटक करंत १लाख ७५हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच दुसर्या एका प्रकरणात रेकाॅर्डवरचा मोटरसायकल चोर जुनेदशैख आरेफ शेख(२०) रा. संजयनगर याला १लाख रु.किमतीच्या मोटर सायकल सहित अटक केली. वरील दोन्ही कारवाया पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गौतम वावळे, पीएसआय दत्ता शेळके, पोलिस कर्मचारी प्रकाश गायकवाड, संतोष बमनात यांनी पार पाडल्या
रेकॉर्डवरील दुचाकी चोर अटकेत
औरंगाबाद : जिन्सी पोलिसांनी रेकॉर्डवरील दुचाकी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे. जुनेद शेख आरेफ शेख (२०, रा. गल्ली क्र. सीसी-१५, संजयनगर) असे त्याचे नाव आहे. रोहीत सौदागर क्षीरसागर (२५, रा. एन-६, सिडको) यांनी ५ जानेवारी रोजी घरासमोर दुचाकी उभी केली होती. त्यांची दुचाकी जुनेद शेख याने हँडल लॉक तोडून लांबवली होती. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक संजय गावंडे, नंदलाल चव्हाण, संतोष बमनात यांनी अटक केली. त्याच्याविरुध्द यापुर्वी सिडको पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.